ग्रंथविश्व

ग्रंथविश्व : समान नागरी कायद्याचे राजकारण

समान नागरी कायद्याची आवश्यकता व शक्यता याबद्दल आपण अनेक वर्षे वाचत, विचार करत व त्या विषयी चर्चा करत आलो आहोत. त्यामुळे पार्थसारथी घोष यांचे. 'द पॉलिटिक्स ऑफ पर्सनल लॉ इन साऊथ एशिया आयडेंटिटी. नॅशनॅलिझम अँड द युनिफॉर्म सिव्हिल कोड' हे पुस्तक बघताच कुतूहलवश ते वाचावयास घेतले. डॉ. घोष हे राजकीय विश्लेषक आहेत व भारतातील राजकारणावर त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.